रामकृष्ण विवेक सरिता


श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद व श्री शारदादेवी यांच्याबद्दल थोडे व बरेच काही - विशेष रितीने या वेबसाइट द्वारे डिजीटल माध्यमातून मराठी भाषेत प्रथमच उपलब्ध करून देण्यासाठी हा एक विनम्र प्रयत्न !

श्रीरामकृष्ण, स्वामी विवेकानंद व श्री शारदादेवी यांचे असामान्य दैनंदिन जीवन, कार्य व उपदेश अशी बरीच माहिती या वेबसाइट द्वारे उपलब्ध होईल.

ही वेबसाइट गुगल साइट्च्या माध्यमातून केली आहे. ती जतन करण्यासाठी कृपया ’यु आर एल’ आपण (सेव्ह) जतन करावा. www.sriramakrishnavivekananda.info

यामधे उपलब्ध असलेली काही माहिती बंगाली व इंग्रजी भाषेतील पुस्तकातून संकलित करण्यात आली आहे. रामकृष्ण विवेक सरिता ही श्रीरामकृष्णांनी गायलेल्या गाण्यांबद्दल माहिती देते. या माहितीचा वाचकांना अभ्यासुवृत्तीने आनंद घेता येईल अशी आशा आहे. श्रीरामकृष्ण वचनामृतांतील मूळ बंगाली गाणी ही मराठीत त्यांच्या भावार्था सोबत व काही गाणी कवितेच्या स्वरूपात प्रथमच डिजीटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी रामकृष्ण विवेक सरितेचा उगम!

श्रीरामकृष्णांचे दैनंदिन जीवन संगीताने पूर्ण व्यापून टाकलेले होते. त्यांचे जीवन एक सर्वोच्च प्रतीचे अलौकिक संगीत होते. गायन ही त्यांची प्रार्थना होती. गायन व नर्तन हे ’भावमुखी’ श्रीरामकृष्णांची ’भावसृष्टी’ होती. त्यांचा आत्माविष्कार होता. भावमुखी श्रीरामकृष्णांचा ज्यावेळी जो भाव हृदयाला व्यापून टाकीत असे तोच भाव स्वरांमध्ये परिणत होऊन ओसंडत बाहेर वाहत असे. उपस्थित सार्‍या ‘तप्त’ जीवांना एका अनिर्वचनीय शांतीचा, आनंदाचा अनुभव लाभत असे.

श्रीरामकृष्णांनी गायलेली गाणी डिजीटल रुपात वाचून आपली हृदये त्यांच्या भावाने भरून जावो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना!

या सरितेचे प्रमुख भाग पुढील प्रमाणे - (त्यावर ’क्लिक’ केल्यास ते भाग आपणास वाचावयास मिळतील.)


आपला अभिप्राय कळविण्यासाठी ई-मेल करा -

contact@sriramakrishnavivekananda.info